महाराष्ट्र शासनाच्या वतीने ही एक नवीन पोस्ट काढण्यात आलेली आहे .मुख्यमंत्री योजनादूत भरती अंतर्गत महाराष्ट्र राज्यात एकूण 50 हजार जागांची भरती काढण्यात येणार आहे. या संदर्भातला जीआर सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने निर्गमित करण्यात आलेला आहे.
योजनादूत नेमकं काय आहे यासाठी कोणते कागदपत्रे लागणार अर्ज कसा करायचा यासाठी कोणते लाभार्थी पात्र असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशिक्षण विभागांतर्गत एक जीआर याठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे जर तुम्हाला हा जीआर डाऊनलोड करायचा असेल तर लेखाचे शेवटी तुम्हाला जीआर डाऊनलोड करा असे बटन असेल त्यावर क्लिक करून तुम्ही हा जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता.
या जीआर मध्ये कोणती माहिती कशाप्रकारे सांगितलेली आहे ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत.
मुख्यमंत्री योजनादूत भरती जीआर बघा
महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणी बाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशिक्षण विभागाअंतर्गत दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार करणे प्रसार करणे व इतर लाभार्थ्यांना या योजनांचे लाभ मिळवून देणे किंवा लाभ मिळवण्यास मदत करणे व या मधूनच इतर काही अशाच प्रकारचे काम या योजनादूत साठी नेमलेल्या लाभार्थ्याचे राहणार आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये हे योजनादूत नेमले जाणार आहे तर यांची एकूण संख्या ही 50000 इतकी असणार आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 50 हजार योजना दूध जागांसाठी मान्यता देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना या या योजनांचा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार व्हावा व प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन 2024 25 मध्ये एकूण 50 हजार योजनादूत नेमले जाणार आहे. म्हणजेच मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे.
या प्रकारची माहिती जीआर मध्ये म्हणजेच शासन निर्णयामध्ये दिलेल्या असून तुम्ही ही माहिती सविस्तरपणे तुमच्या मोबाईल मध्ये जीआर डाऊनलोड करून वाचू शकता.
मुख्यमंत्री योजनादूत भरती कार्यपद्धत व वैशिष्ट्ये
मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे यासाठीच प्रत्येक ग्रामपंचायत साठी एक व शहरी भागासाठी 5000 लोकांसाठी एक योजनादूत अशाप्रकारे एकूण 50 हजार योजनादूत निवडले जाणार आहे.
मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या लाभार्थ्याला एकूण दहा हजार रुपये प्रति महिना एवढे मानधन देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री योजना दूतासोबत सहा महिन्याचा करार करण्यात येणार आहे हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविल्या जाणार नाही.
म्हणजेच पात्र लाभार्थ्याला एकूण सहा महिने योजनादूत म्हणून राहता येणार आहे.
कोणत्या आहे पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थी हा 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान असावा.
शैक्षणिक मर्यादेमध्ये कोणत्याही शाखेमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे
लाभार्थ्याला संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे तरच लाभार्थी यासाठी पात्र ठरणार आहे.
उमेदवाराकडे मोबाईल फोन असणे आवश्यक आहे.
लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
लाभार्थ्याचे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे व हे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे.
कोणते कागदपत्रे आहे आवश्यक
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
आवश्यक कागदपत्रांमध्ये लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
लाभार्थी पदवी उत्तीर्ण आहे याबाबतचा पुरावा.
अधिवास दाखला.
लाभार्थ्याच्या वैयक्तिक बँक खात्याची तपशील.
पासपोर्ट साईज फोटो.
हमीपत्र, हमीपत्र हे तुम्हाला ऑनलाईन अर्जामध्येच देण्यात येणार आहे.
अशा पद्धतीने होणार निवड
उमेदवाराच्या प्राप्त अर्जाची व नोंदणीची छाननी करून ऑनलाइन रित्या पूर्ण करण्यात येणार आहे.
ऑनलाइन अर्जाची छाननी केल्यानंतर जे लाभार्थी यासाठी पात्र ठरणार आहे त्या लाभार्थ्यांची यादी प्रत्येक जिल्ह्यामध्ये माहिती अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांना जे काही कामकाज सोपविल्या जाणार आहे त्याची नोंदणी शासकीय काम शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही.
अशाप्रकारे माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे जर तुम्हाला ही माहिती वाचायची असेल तर खालील जीआर डाऊनलोड करा या बटनावरती क्लिक करून तुम्ही हा जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून ही संपूर्ण माहिती वाचू शकता.
या योजनेसाठी अद्यापही कुठल्याही प्रकारचे अर्ज सुरू करण्यात आलेले नाही.