शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय चांगल्या प्रकारची बातमी आहे नमो शेतकरी योजना अंतर्गत जो चौथा हफ्ता आहे तो आता शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे.
नमो शेतकरी योजना चौथा हफ्ता वितरित करण्याबाबत जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे या जीआर मध्ये किती निधी वितरित करण्यात येणार आहे व हा निधी कशाप्रकारे वितरित करण्यात येणार आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती या जीआर मध्ये दिलेली आहे.
दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी नमो शेतकरी योजना चौथा हफ्ता लाभार्थ्याला अदा करण्याबाबत कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाअंतर्गत हा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे जर तुम्हाला हा जीआर बघायचा असेल किंवा डाऊनलोड करायचा असेल तर लेखाच्या शेवटी जाऊन तुम्ही हा जीआर डाउनलोड करू शकता.
चौथा हफ्ता लाभ घेण्यासाठी जे लाभार्थी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत पात्र आहे अशाच लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हफ्ता वितरित करण्यात येणार आहे.
नमो शेतकरी योजना चौथा हफ्ता शासन निर्णय बघा
जे लाभार्थी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र आहे अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ म्हणजेच प्रतिवर्षी सहा हजार रुपये इतका निधी दिला जातो.
नमो शेतकरी योजना अंतर्गत तीन हप्ते वितरित करण्यात आलेले आहे तर चौथ्या हफ्ता वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे व निधी जाहीर करण्यात आलेला आहे. ही निधी माहे एप्रिल ते जुलै या महिन्यासाठी आहे.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी चौथा हफ्ता वितरित करण्यासाठी एकूण २०६२.६६ इतका निधी वितरित करण्याबाबत या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
बऱ्याच लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनाचा तिसरा हफ्ता मिळालेला नाही तर चौथ्या आपल्याबरोबर राहिलेले हफ्ते सुद्धा आता पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे.
हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार व लाभार्थ्यांना कधी या योजनेचा लाभ मिळणार यासंदर्भातची कोणतीही तारीख अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही.
लवकरच पात्र लाभार्थ्यांना हा निधी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करून देण्यात येणार आहे निधी कधी मिळणार या संदर्भाची तारीख अजून आलेली नाही.
जर तुम्हाला हा जीआर डाऊनलोड करायचा असेल तर खाली दिलेल्या डाऊनलोड या बटनावर क्लिक करून तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही हा जीआर बघू शकता. ही माहिती सविस्तरपणे वाचू शकता.