मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत या महिला लाभार्थ्यांची फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले आहे किंवा ज्या महिला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही अशांसाठी आता आनंदाची बातमी आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आता परत एक जीआर निर्मित करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणी करण्याअंतर्गत दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी एक म्हणजेच काल एक नवीन जीआर याठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे.
जर तुम्हाला हा जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून ही माहिती सविस्तरपणे बघायची असेल तर लेखाच्या शेवटी जीआर डाऊनलोड करा असे बटन या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही हा जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून अगदी व्यवस्थित रित्या ही माहिती वाचू शकता.
राज्यातील महिलांना आर्थिक स्वतंत्र व स्वावलंबी बनवण्यासाठी ही एक योजना राबवली जात आहे या योजनेचे नाव माझी लाडकी बहीण योजना असे आहे या अंतर्गत पात्र महिलांना काही निधी वितरित करण्यात येतो.
या निमित्रीत करण्यात आलेल्या निधी अंतर्गत महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील कामांसाठी काही मदत व्हावी यामुळे हा निधी या महिलांना वितरित करण्यात येतो बऱ्याच महिलांना माझी योजना अंतर्गत तीन हजार ते साडेतीन हजार इतकं निधी वितरित करण्यात आलेला आहे.
या अंतर्गत बऱ्याच महिला या वंचित राहिलेले आहे त्यांच्यासाठी आता ही एक शेवटची संधी म्हणून नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
लाडकी बहीण योजना शासन निर्णय बघा
माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत फॉर्म भरण्यासाठी तारीख ही दिनांक 31 ऑगस्ट 2024 इतकी वाढवण्यात आली होती मागील जीआर नुसार.
या अंतर्गत पात्र झालेल्या महिलांना प्रति महिना 1500 रुपये इतकी रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार होते. बऱ्याचशा महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वितरित सुद्धा करण्यात आलेले आहे.
माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता तारीख वाढ करण्यात आलेली आहे जर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज केले नसेल किंवा तुमचा अर्ज कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झालेला असेल तर आता या अंतर्गत तुम्ही परत एकदा अर्ज करू शकता.
हा अर्ज कधी करायचा याची शेवटची तारीख कोणती असणार आहे ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
लाडकी बहीण योजना अंतर्गत फॉर्म भरण्याची तारीख वाढ करण्यात आलेली असून ही तारीख पूर्ण सप्टेंबर महिना इतकी करण्यात आलेली आहे या महिन्यामध्ये तुम्ही हा फॉर्म आता भरू शकता.