मेंढी पालन योजना 2024 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 2.5 लाख इतके अनुदान देण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना अंतर्गत हे लाभार्थी पात्र ठरविण्यात येणार आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा कोठे करायचा व यासाठी लागणारी कागदपत्रे व अर्जाची शेवटची तारीख कोणती आहे ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळू शकेल.
राज्यातील भटक्या जमाती धनगर व तत्सल जमातींकरता ही योजना राबविली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची वय हे 18 ते 60 च्या दरम्यान असावे.
लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज कसा करायचा व कोठे करायचा ही संपूर्ण माहिती याठिकाणी दिलेली आहे.
मेंढी पालन योजना 2024 असा घ्या लाभ
राजे यशवंतराव होळकर महामेश योजना २०२४ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना २० मेंढ्या आणि एक नर मेंढा देण्यात येणार आहे. जयमध्ये पात्र लाभार्थ्याला २.५ लाखांपर्यंत अनुदान देण्यात येते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज लाभार्थ्याला २६ सप्टेंबर २०२४ च्या आधी करावा लागणार आहे. २६ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. लाभार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर अर्जाची पावती ही लाभार्थ्याला 26 सप्टेंबर 2024 च्या नंतर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी भटक्या जमातीतील लाभार्थ्यांना मिळणार देण्यात येणार आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ज्यामध्ये तुम्ही वेबसाईटवरून अर्ज करू शकता आणि महामेष या ॲप्लिकेशन वरूनही अर्ज करू शकता.
असा करा ऑनलाईन अर्ज
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला महामेष या वेबसाईटवर यायचे आहे वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लाल रंगांमध्ये अर्ज करा असे ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा.
आता या ठिकाणी तुम्हाला काही महत्वाची सूचना दिलेले आहे या सूचना व्यवस्थितपणे वाचून घ्या व पुढे नवीन अर्जदार या पर्यायावर करा.
ठिकाणी अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरायची आहे.अर्जदाराची संपूर्ण नाव. जन्मदिनांक वय लिंग मोबाईल क्रमांक ई-मेल आयडी जिल्हा तालुका गाव जात प्रवर्ग जात प्रवर्ग प्रमाणपत्र रेशन कार्ड विवाह स्थिती बँकेचे नाव खाते क्रमांक IFSC क्रमांक शाखा पिनकोड इत्यादी माहिती या ठिकाणी भरायची आहे.
ही माहिती भरल्यानंतर आता तुम्हाला एकूण कुटुंबातील सदस्यांची संख्या किती आहे ते निवडायची आहे ते निवडल्यानंतर प्रत्येक कुटुंबातील सदस्याचे आधार क्रमांक या ठिकाणी टाकावे लागणार आहे. तसेच रेशन कार्ड नुसार नाव लिंग व व या ठिकाणी टाकावे लागणार आहे.
ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला काही माहिती जर चुकीची वाटली तर या ठिकाणी तुम्ही आता सेट करू शकता सबमिट केल्यानंतर तुम्हाला विचारण्यात येईल माहिती बरोबर आहे का जर असेल तर संपूर्ण माहिती बरोबर असल्याची खात्री करा व सबमिट करा.
या ठिकाणी लाभार्थ्यांना 18 योजना दिलेल्या आहे यापैकी लाभार्थी कोणत्याही योजनेचा लाभ घेऊ शकतो. तुम्हाला ज्या योजनेचा लाभ हवा आहे ती योजना सिलेक्ट करा.