बांधकाम कामगारांना कोणतेही योजनेचा लाभ घेण्यासाठी 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हे आवश्यक असते यासोबतच बांधकाम कामगार नूतनीकरण करणे सुद्धा आवश्यक असते. सध्याच्या काळात बांधकाम कामगारांसाठी बऱ्याच योजना राबविल्या जात आहे आणि यामध्ये संसार बाटली व सुरक्षा संच हे सुद्धा वितरित करण्यात येत आहे.
जय बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा या योजनेचा लाभ मिळत नसेल तर त्यांना यासाठी नूतनीकरण करणे आवश्यक आहे नूतनीकरण करण्यासोबतच यासाठी 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे.
पात्र बांधकाम कामगारांनी 90 दिवस काम केले आहे हे प्रमाणपत्र जर पात्र लाभार्थ्याकडे असेल तर बऱ्याचशा अशा योजना आहे ज्या योजनांचा लाभ मात्र बांधकाम कामगारांना मिळू शकतो.
बऱ्याच लाभार्थ्याला हे माहीत नसते की हे 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र कोणाकडे मिळते. जर तुम्हाला हे 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हवे असेल तर लेखाच्या शेवटी तुम्हाला एक अर्ज डाऊनलोड करा किंवा प्रमाणपत्र डाऊनलोड करा असे बटन दिसेल.
या बटनावर क्लिक करून तुम्ही हे प्रमाणपत्र तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून या प्रमाणपत्राची प्रिंट काढून व त्यावरील संपूर्ण माहिती योग्यरित्या भरून हे 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करू शकता.
90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र अशा पद्धतीने भरा माहिती
बांधकाम कामगारांनी 90 दिवस काम केले आहे याचा पुरावा म्हणून हे 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आहे.
आता या ठिकाणी तुम्हाला काही माहिती भरावी लागणार आहे ही माहिती तुम्हाला अचूकपणे भरायची आहे ही माहिती कशी बघा खालील प्रमाणे.
सर्वात पहिले या अर्जाच्या डाव्या साईडला तुम्हाला एक जावक क्रमांक विचारल्या जाईल या ठिकाणी तुम्हाला हा जावक क्रमांक टाकायचा आहे. हा जावक क्रमांक तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दाराकडे मिळून जाईल कॉन्ट्रॅक्टदाराला विचारून या ठिकाणी तुम्हाला हा जावक क्रमांक टाकायचा आहे.
यानंतर या ठिकाणी तुम्हाला जावक दिनांक टाकायचा आहे जावक दिनांक म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हे प्रमाणपत्र भरत आहात हा अर्ज भरत आहात त्या दिवसाचा दिनांक.
आता जावक दिनांक याच्याच खाली तुम्हाला अर्जदाराचा लाभार्थ्याचा एक पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे. या फोटोवर कॉन्ट्रॅक्टदाराचा सही व शिक्का घेणे आवश्यक आहे.
आता हा अर्ज तुम्हाला एकदा व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी सर्वात पहिले तुम्हाला अर्जदाराची लाभार्थ्याचे नाव टाकायचे आहे.
याखाली आस्थापनेचे नाव टाकायचे आहे म्हणजे ज्या ठिकाणी काम चालू आहे ज्या साइटवर काम चालू आहे त्या साईटचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे.
ही माहिती भरल्यानंतर नोंदणी क्रमांक सुद्धा टाकावं लागणार आहे हा नोंदणी क्रमांक लाभार्थ्याला कॉन्ट्रॅक्टदाराला विचाराव लागणार आहे हा नोंदणी क्रमांक कॉन्ट्रॅक्टदाराकडे असतो. ही माहिती भरल्यानंतर या ठिकाणी विभागाचे नाव सुद्धा टाकावे लागणार आहे.
या ठिकाणी कॉन्टॅक्ट दाराचा पत्ता सुद्धा टाकावा लागणार आहे जसे की गाव तालुका जिल्हा पिन कोड व मोबाईल क्रमांक ही कॉन्ट्रॅक्टदाराची संपूर्ण माहिती या ठिकाणी लाभार्थ्याला टाकावी लागणार आहे.
कामगाराची माहिती भरा
ही संपूर्ण माहिती आपण कॉन्टॅक्ट दाराबद्दल भरलेली आहे आता कामगाराबद्दल माहिती या ठिकाणी भरावी लागणार आहे ही माहिती कशाप्रकारे भरायची बघा खालील प्रमाणे.
या ठिकाणी कामगाराचे नाव वय कामगार चा पत्ता गाव तालुका जिल्हा पिन कोड मोबाईल क्रमांक कामाचा प्रकार कोणता आहे हे या ठिकाणी टाकायचे आहे.
कामाचा कालावधी क्रमांक म्हणजेच लाभार्थी कोणत्या दिवसापासून कामाला लागलेला आहे व कोणत्या दिवसापर्यंत लाभार्थ्यांनी काम केलेले आहे ही दिनांक या ठिकाणी टाकायचे आहे. याखाली एकूण दिवस म्हणजे लाभार्थ्याने एकूण किती दिवस काम केलेले आहे 90 दिवस 92 दिवस ही माहिती या ठिकाणी टाकायची आहे.
याखाली कामगाराची सध्याची कामाची ठिकाण व पत्ता ही माहिती भरायची आहे. जसे की गाव तालुका जिल्हा पिनकोड दिनांक व वेतन ही माहिती या ठिकाणी भरायची आहे.
या खाली कॉन्टॅक्ट करायचा सही व शिक्का घेणे आवश्यक आहे. अशाप्रकारे तुम्ही हा काम केल्याचे प्रमाणपत्र मिळवू शकता.