सोयाबीन कापूस अनुदान ऑनलाइन यादी बघा

सोयाबीन कापूस अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे या संदर्भात महाराष्ट्र शासनाने जीआर सुद्धा निर्गमित केलेला आहे.

सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 व याची मर्यादा ही दोन हेक्टर पर्यंत आहे म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना एकूण दहा हजार रुपये या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे.

हे अनुदान कशाप्रकारे वितरित करण्यात येणार आहे व त्याचा लाभ कसा घ्यायचा ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे खालील प्रमाणे.

सोयाबीन व कापूस अनुदान योजनेसाठी कोणते लाभार्थी पात्र आहे या संदर्भाची यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीमध्ये तुमचे नाव आहे का नाव असेल तर पुढे कोणती प्रक्रिया करायची व ही यादी ऑनलाईन पद्धतीने कशी बघायची यासाठी कोणती वेबसाईट आहे. ही संपूर्ण माहिती तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवर सुद्धा बघू शकता.

सोयाबीन कापूस अनुदान यादी बघा

या अनुदानासाठी कोणते लाभार्थी पात्र आहे व ही यादी बघण्यासाठी uatscagridbt.mahaitgov.in या वेबसाईटवर जायचे आहे.

जरी तुम्ही वेबसाईट ओपन करा तसेच तुमच्यासमोर कृषी विभाग व महाराष्ट्र शासन या संदर्भात काही माहिती दिसेल.

या ठिकाणी तुम्हाला तीन पर्याय दिसेल त्यापैकी शेवटचा पर्याय म्हणजेच फार्मर सर्च या बटणावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत एक पेज निर्माण होईल फार्मर लॉगिन.

या ठिकाणी तुम्हाला फार्मर लॉगिन असे नाव दिसेल त्याखाली शेतकऱ्याचा आधार क्रमांक टाका. यानंतर get otp for adhar verification या बटनावर क्लिक करा.

जो मोबाईल क्रमांक आधार क्रमांक ला लिंक आहे त्यावर ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी या पुढील चौकटीमध्ये टाका. Verify adhar for OTP यावर क्लिक करा.

वरील संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता तुम्हाला farmer list दिसेल यासाठी तुम्हाला अजून काही माहिती या ठिकाणी भरायची आहे.

ही यादी बघण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले तुमचा विभाग जिल्हा तालुका आणि ज्या ठिकाणी तुमची शेत आहे ते गाव निवडा.

वरील निवडलेली माहिती संपूर्ण माहिती योग्य आहे का याची खात्री करा आणि सर्च बटणावर क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच तुमच्या गावाची यादी या ठिकाणी दिसेल.

काही तांत्रिक अडचणीमुळे वेबसाईट बंद असणे किंवा काही पर्याय न दिसणे या समस्यांचे सामना लाभार्थ्यांना करावा लागू शकतो त्यामुळे वेबसाईट जर चालत नसेल तर परत परत तपासा किंवा काही वेळानंतर प्रयत्न करा या मागचे कारण म्हणजेच काही तांत्रिक अडचण असू शकते.

Leave a Comment