Pm किसान नोंदणी मोठे बदल बघा

Pm किसान नोंदणी करणाऱ्या लभर्थ्याना आता हे करणे आवश्यक आहे. जे लाभार्थी नवीन नोंदणी करणार आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. या संदर्भात शासनाच्या वतीने प्रसिद्धी पत्रक सुद्धा निर्गमित करण्यात आलेले आहे.

यासाठी कोणते लाभार्थी पात्र आणार आहे नवीन कार्यपद्धती कोणत्या आहे आणि यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहे ही संपूर्ण माहिती याठिकाणी दिलेली आहे.

Pm किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रति वर्ष 6 हजार रुपये वितरित करण्यात येते. हा निधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून दिला जातो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी लाभार्थ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता कार्यपद्धती बदलण्यात आलेल्या आहे. कोणते लाभार्थी आहे पात्र.

Pm किसान नोंदनी कोणते आहे मोठे बदल

कोणते बदल करण्यात आलेले आहे आणि कोणते कागदपत्रे आवश्यक आहे यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. या पत्रकमधे नवीन नोंदणी करणाऱ्या लभर्थ्यासाठी सूचना देण्यात आलेली आहे.

जे लाभार्थी नवीन नोंदणी करणार आहे त्यांना काही महत्त्वाचे कागदपत्रे याठिकाणी आवश्यक लागणार आहे.मागील 3 महिन्यातील डिजिटल किंवा तलाठी सहीचा सातबारा उतारा याठिकाणी नोंदणी करताना ऑनलाईन पोर्टल वर upload करावा लागणार आहे.

मागील 3 महिन्यातील डिजिटल किंवा तलाठी सहीचा सातबारा उतारा याठिकाणी नोंदणी करताना ऑनलाईन पोर्टल वर upload करावा लागणार आहे.

जमीन नोंदणीचा फेरफार १/२/२०१९ पूर्वीच जमीन लाभार्थ्यांच्या नावावर असणे आवश्यक आहे.

पती-पत्नी व 18 वर्षाखालील आपत्याचे आधार कार्ड एका पानावर स्कॅन करावे.

वारसा नोंद फेरफार दिनांक १/२/२०१९ नंतरची असल्यास ज्याच्या नावावरून वारसाने जमीन आली त्याच्या नावे जमीन असल्याची फेरफार सुद्धा जोडावे लागणार आहे.

या प्रकारचे हे कागदपत्रे तुम्हाला द्यावे लागणार आहे.

ऑनलाइन नोंदणी करताना जेव्हा नावाची हे कागदपत्रे अपलोड करेल त्यावेळेस या संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. यानंतरच लाभार्थी पात्र आहे की अपात्र आहे हे ठरवण्यात येईल.

यानंतरच लाभार्थी पात्र आहे की अपात्र आहे हे ठरवण्यात येईल.काही कारणास्तव जर तुमचा अर्ज रद्द होत असेल किंवा नामंजूर होत असेल तर याबद्दल तुम्हाला परत एक संधी देण्यात येणार आहे यासाठी काही कागदपत्रे जोडावे लागणार आहे ही कागदपत्रे बघा खालील प्रमाणे.

अपात्रता मागे घेण्याचा विहित नमुन्यातील अर्ज.

लाभार्थ्याची पोर्टल वरील स्टेटस ची प्रिंट म्हणजेच ऑनलाइन अर्ज करताना लाभार्थ्याची स्टेटस कसे आहे याची प्रिंट.

पती-पत्नीचे व 18 वर्षाखालील आपत्याचे आधार कार्ड. परिशिष्ट बी सुद्धा आवश्यक असणार आहे.

नवीन सातबारा व 8 अ उतारा लागेल डिजिटल किंवा तलाठी सही सहित.

जमीन नोंदणीची फेरफार व वारस फेरफार

याबद्दलच्या अधिक माहितीसाठी तुम्ही कृषी अधिकारी सोबत सुद्धा संपर्क करू शकता. (Pm किसान नोंदणी)

Leave a Comment