शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यान काही अनुदान देण्यात येणार आहे. या संधर्भात महाराष्ट्र शासनाच्या वतीने जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला होता या अनुदान संधर्भात बरेचसे अपडेट देण्यात आलेले होते (सोयाबीन कापूस अनुदान KYC).
याच संधर्भात हे एक नवीन अपडेट आलेले आहे. ज्या शेतकर्यांना हे अनुदान हवे असेलत्या शेतकऱ्यांना KYC करणे आवश्यक आहे. नाहीतर या योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळणार नाही. ही KYC कशी करायची यासाठी कोणते कागदपत्रे आवशक आहे आणि कोठे करायची ही संपूर्ण माहिती बघा खालीलप्रमाणे.
खरीप हंगाम २०२३ अंतर्गत सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. हे अनुदान प्रती हेक्टर ५ हजार रुपये प्रमाणे देण्यात येणार आहे याची मर्यादा ही २ हेक्टर पर्यंत आहे.
दिनांक २६ सप्टेबर २०२४ रोजी शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाशी संपर्क करून KYC करून घेण्याचे आवाहन हे कृषी विभाघाने केले आहे. २९ सप्टेंबर रोजी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे.
२५ सप्टेंबरच्या आकडेवारी नुसार २१ लाख शेतकऱ्यांची आधार e-KYC राहिलेली आहे. ज्या लाभार्थ्याची KYC होणार नाही ते अनुदानापासून वंचित राहील. त्यामुळे लवकरच ही KYC करून घ्या. KYC कशी करायची बघा खालीलप्रमाणे.
सोयाबीन कापूस अनुदान ऑनलाईन KYC करा.
आधार KYC तुम्ही तुमच्या मोबाईल वरून सुद्धा करू शकता. यासाठी तुम्हाला mahaDBT SCAGRI – Maha IT या साईट वर जायचे आहे.
आता याठिकाणी तुम्हाला दोन पर्याय दिसेल Login आणि Disbursement Status. यापैकी Disbursement Status या पर्यायार क्लिक करा.
आता याठिकाणी तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपेन होईल त्यामध्ये तुम्हाला आधार क्रमांक आणि otp आणि कॅपच्या कोड टाकायचा आहे.
जो मोबाईल क्रमांक तुमच्या आधार कार्ड ला लिंक असेल त्यावर एक otp पाठवला जाईल तो otp याठिकाणी टाका.
आता तुमच्यासमोर एक पेज ओपेन होईल त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती असेल जसे की ई पीक पाहणी माहिती e-KYC स्टेटस ही संपूर्ण माहिती तुम्हाला याठिकाणी दाखवण्यात येईल तुमची KYC पूर्ण झाल्यावर.
अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ही KYC करू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जमत नसेल तर तुम्ही कृषी सहाय्यक च्या मदतीने सुद्धा KYC करू शकता किवा CSC केंद्रातही तुम्ही ही KYC करू शकता.