मतदान कार्ड काढा ऑनलाईन voter id card download 2024

तुमच्याकडे जर मतदान कार्ड नसेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे आता तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मतदान कार्ड काढू शकता तेही काही मिनिटांमध्ये हे मतदान कार्ड ऑनलाईन पद्धतीने काढू शकता (मतदान कार्ड काढा ऑनलाईन).

हे कार्ड कसे काढायचे व यासाठी कोणती प्रक्रिया आहे हे संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

मतदान कार्ड हे अतिशय महत्त्वाच्या कार्डांमधून एक आहे जसे एका नागरिकाचे आधार कार्ड महत्त्वाचे असते तसेच मतदान कार्ड हे अतिशय महत्त्वाचे असते हे मतदान कार्ड आपल्याला मत देताना खूप आवश्यक असते.

ऑनलाइन मतदान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर वरून एक ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे या ॲप मध्ये तुम्हाला ही संपूर्ण प्रक्रिया करावी लागणार आहे. या ॲपचे नाव Voter Helpline असे आहे.

Voter Helpline ॲपच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने मतदान कार्ड कशा पद्धतीने काढायचे बघा संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.

मतदान यादी बघा.

मतदान कार्ड काढा ऑनलाईन कशी आहे पद्धत

मतदान कार्ड ऑनलाइन काढण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले play store वरून Voter Helpline हे ॲप डाऊनलोड करून घ्यायचे आहे.

ॲप डाऊनलोड झाल्यानंतर जर तुमची या ठिकाणी पहिले अकाउंट असेल जर पहिले खाते असेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.

जर या ॲपवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर तुम्हाला या ठिकाण new user म्हणून साइन अप करावे लागणार आहे.

जर तुम्हाला नवीन खाते या ॲपवर उघडायचे असेल तर या न्यू यूजर पर्यावरण. पर्यायवाची टच केल्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक संपूर्ण नाव, पासवर्ड आणि ओटीपी टाकून सबमिट या पर्यावरण टच करायची आहे.

नवीन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो पासवर्ड तुम्ही नोंदणी करताना वापरलेला आहे तो पासवर्ड वापरून या ठिकाणी लॉगिन करायचे आहे.

अशा पद्धतीने तुम्ही या ॲप मध्ये तुमचे नवीन खाते खोलू शकता. आता आपण बघणार आहोत की ऑनलाईन पद्धतीने मतदार कार्ड डाऊनलोड कशा पद्धतीने करायचे.

मतदान कार्ड काढा ऑनलाईन अशा पद्धतीने करा नोंदणी step no. 1

या ॲप मध्ये लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला बरेच पर्याय दिसतील त्यापैकी पहिल्याच पर्याय म्हणजेच Voter Registration या पर्यायावर टच करायचे आहे.

यानंतर तुम्ही समोर परत एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला फॉर्म 6 (New Voter Registration) म्हणून एक फॉर्म भरावा लागणार आहे.

या पर्यावरण केल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जाईल त्या त्या प्रश्नांची उत्तरे एकदम योग्य पद्धतीने द्या त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म तयार होईल हा फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे.

हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला एकूण पाच स्टेप कम्प्लीट करावे लागणार आहे ज्यामध्ये पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, मतदार संघ आणि अर्जदाराची जन्मतारीख (आधार कार्ड प्रमाणे).

जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुम्हाला या ठिकाणी काही डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे यामध्ये तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड व इतर बरेच डॉक्युमेंट आहे यामधून कोणतेही एक डॉक्युमेंट अपलोड करू शकता ही संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला भरावी लागणार आहे.

या खालच्या पर्यायामध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स काढून त्या झेरॉक्स वर तुमची सिग्नेचर म्हणजेच तुमची सही करायची आहे आणि ते डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहे.

ही सर्व माहिती आपल्याला पहिल्या स्टेप मध्ये भरावे लागणार आहे तरच आपली पहिली स्टेप म्हणजेच पहिली पायरी या ठिकाणी पूर्ण होणार आहे. दुसऱ्या स्टेप मध्ये कोणती माहिती भरावी लागणार आहे बघा खालील प्रमाणे.

Step no. 2

दुसऱ्या पायरीमध्ये तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज चा एक फोटो या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे. हा पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला JPEG/JPG या फॉरमॅटमध्ये अपलोड करावे लागणार आहे आणि या पासपोर्ट साईज फोटोची साईज ही 200kb किंवा यापेक्षा कमी असायला हवी तरच तुमचा फोटो या ठिकाणी स्वीकारल्या जाईल.

याखाली अर्जदाराचे  लिंग नाव रजिस्ट्रेशन वरती नाव कशा पद्धतीने टाकायचे आहे ते सुद्धा तुम्हाला दुसऱ्या रकान्यामध्ये दुसऱ्या चौकटीमध्ये टाकायचे आहे त्यानंतर तुमची आडनाव सुद्धा खालील चौकटीमध्ये टाकायचे आहे.

याखाली तुम्हाला आधार कार्ड डिटेल्स मध्ये तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे.

या खालच्या चौकटीत तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे जो मोबाईल क्रमांक तुमचा चालू मोबाईल क्रमांक आहे तोच मोबाईल क्रमांक तुम्ही या ठिकाणी टाका.

जर तुम्ही अपंग असाल तर या ठिकाणी तुम्हाला अपंगत्व प्रकार निवडायचा आहे जर तुम्ही अपंग असाल तर या ठिकाणी तुम्हाला काहीच पर्याय निवडायचे नाही आणि ही माहिती अतिशय योग्यरित्या तुम्ही भरत आहे याची खात्री अवश्य करा.

अशा पद्धतीने आपण या दुसऱ्या स्टेप मध्ये संपूर्ण माहिती भरलेली आहे आता तिसरी स्टेप आपल्याला पूर्ण करावी लागणार आहे तिसरी स्टेप बघा खालील प्रमाणे.

Relation type Step no.3

तिसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला Relation type म्हणजेच तुमच्या मतदान कार्ड वर तुम्हाला कोणती नाव लावायचे आहे ज्याही व्यक्तीचे नाव तुम्हाला लावायचे आहे खालीलपैकी तुम्ही  एक पर्याय निवडू शकता.

जाहीर relative चे नाव तुम्हाला या ठिकाणी लावायचे आहे त्या relative चे नाव तुम्हाला खालील चौकटीमध्ये टाकायचे आहे.

Address Step no.4

चौथ्या स्टेप मध्ये तुम्हाला तुमचा संपूर्ण  Address या ठिकाणी भरावा लागणार आहे हा ऍड्रेस तुम्हाला अतिशय योग्यरित्या भरावा लागणार आहे.

जसा ऍड्रेस तुमच्या आधार कार्डवर आहे जसा ऍड्रेस तुमच्या बँक पासबुक वर आहे अगदी तशाच प्रकारचा योग्य आणि फुल ऍड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागणार आहे.

Address टाकल्यानंतर हा योग्य आहे का आणि फुल आहे का याची खात्री करून घ्या. यामध्ये मला गावाचे नाव पोस्टाचे नाव पिन कोड वअशी इतर बरीच माहिती भरावी लागणार आहे.

या ठिकाणी तुम्हाला परत तुमचे आधार कार्ड सही करून अपलोड करावे लागणार आहे.

तुमच्या परिवारामध्ये कोणत्या व्यक्तीची मतदान कार्ड आहे ते या ठिकाणी निवडा आणि त्याखाली Epic नंबर म्हणजेच ज्या व्यक्तीचे मतदान कार्ड आहे त्या व्यक्तीच्या मतदान क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे.

Declaration Step no.5

पाचवी स्टेप ही शेवटची स्टेप असणार आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा जन्म झालेले ठिकाण म्हणजे जन्म झालेला जिल्हा आणि गाव निवडायचे आहे.

यानंतर खाली या आणि या चौकटीमध्ये तुमचे नाव टाका व इतर थोडी काही माहिती भरा.

या पाच स्टेप मध्ये भरलेली जी काही माहिती आहे ती माहिती तुम्ही अतिशय योग्यरीत्या आणि valid माहिती भरलेली असेल याची खात्री करा आणि Done या बटणावरती टच करा.

आता जो फॉर्म आपण या ठिकाणी पाच स्टेप मध्ये भरलेला आहे तो फॉर्म संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येईल या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती परत चेक करायला मिळणार आहे.

तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती जर योग्य असेल तर या ठिकाणी तुम्हाला खाली एक Confirm असा पर्याय दिसेल त्यावरती टच करा. अजून केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल आणि या ठिकाणी तुम्हाला एक Reference I’d सुद्धा मिळेल.

हा Reference I’d तुम्हाला कामाला येणार आहे त्यामुळे हा Reference I’d जतन करून ठेवा.

तुमची मतदान कार्ड कधी मिळणार आहे याचे स्टेटस सुद्धा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता स्टेटस चेक करण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याच  मुखपृष्ठावर जाऊन पहिल्या पर्यायाला टच करायचे आहे त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती दिसेल.

त्या ठिकाणी तुम्हाला एक ट्रॅक स्टेटस म्हणून असं एक ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला टच करायचे आहे.

स्टेटस बघण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जो काही दिलेला

Reference I’d आहे तो टाकायचा आहे

तुमचे राज्य निवडायचे आहे आणि ट्रॅक स्टेटस या बटना वरती टच करायचे आहे.

अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मतदान कार्डाची संपूर्ण माहिती दाखवण्यात येईल.

अशा पद्धतीने अगदी घरबसल्या तुम्ही मोबाईलवर ऑनलाइन पद्धतीने तुमचे मतदान कार्ड ऑनलाईन पद्धतीने काढू शकता.

सातबारा दुरुस्ती

Leave a Comment