Inwell boring online application इनवेल बोअर योजना 2024

बघा संपूर्ण माहिती इनवेल बोअर योजना संधर्भात खालीलप्रमाणे Inwell boring online application.

शेतीसाठी पाणी हे अत्यंत महत्वाचे आहे जर तुमच्या शेतातील विहिरीमध्ये सुद्धा पाण्याची कमतरता असेल तर आता तुम्ही देखील तुमच्या विहिरीमध्ये इनवेल बोअर घेऊन ही समस्या दूर करू शकता. आता इनवेल बोअर घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला शासनाच्या वतीने अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ फक्त अनुसूचित जाती जमातीतील लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा व कोणते कागदपत्रे आवश्यक आहे या माहितीचा व्हिडिओ सुद्धा लेखाच्या शेवटी दिलेलाअर्ज करण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा बघू शकता.

जेव्हा आपण नवीन विहीर खोदकाम करतो वेळेला आपल्याला अपेक्षेप्रमाणे पाणी लागत नाही आणि आपला झालेला खर्च हा व्यर्थ जातो. पण याला उपाय आहे जर तुम्ही तुमच्या विहिरीमध्ये आडवे बोर घेतले तर पाणी मिळण्याची संभावना असते पण यासाठी मात्र खर्च पण खूप जास्त येतो पण आता जर तुम्हाला विहिरीमध्ये आडवे बोर घ्यायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे हे अनुदान किती आहे आणि कसे मिळणार आहे ही सर्व माहिती आपण बघणार आहोत.

कशी आहे ही योजना आणि कसा घ्यायचा या योजनेचा लाभ व कुठे करायचा या इनवेल बोअर या योजनेसाठी अर्ज ही सर्व माहिती आपण आज या लेखामध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही सुध्दा या योजनेसाठी अर्ज करू शकता.

या योजनेसाठी अर्ज कसा करायचा कुठे करायचा आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते कागदपत्रे हे लागणार आहे ही सर्व माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

Inwell boring online application असा करा अर्ज

जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असले तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा करू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.

या वेबसाईट वर यायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा लॉगीन करायचे आहे लॉगीन करण्यासाठी तुमच्याकडे तुमचा username आणि password असणे अनिवार्य आहे.

लॉगीन झाल्यानंतर तुम्हाला निळ्या रंगामध्ये अर्ज करा असा पर्याय दिसेल या पर्यायावर टच करा.

यानंतर तुम्हाला अनुसूचित जाती व जमाती असा पर्याय दिसेल त्या समोरील बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.

आता तुम्हाला तुमची काही माहिती भरायची आहे. तुम्हाला इनवेल बोअर या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यामुळे इनवेल बोअर वर क्लिक करा.

या ठिकाणी तुम्हाला काही माहिती विचारल्या जाईल ती माहिती योग्य प्रकारे भरा. आणि जतन करा.

हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला २३ रुपये फी म्हणून भरावे लागणार आहे तेव्हाचा तुमचा अर्ज हा जतन कार्यात येणार आहे. ही फी भरण्यासाठी तुम्हाला अर्ज सदर करावा लागणार आहे त्यानंतर तुम्हाला payment च्या संधर्भात सूचना मिळेल त्यावर टच करा.

आता तुम्हाला या ठिकाणी payment करण्यासही खूप सारे पर्याय दिसेल त्यापैकी तुम्हाला जो योग्य वाटेल तो निवडा आणी payment करा.

जसेही तुम्ही payment कराल तुम्हाला या payment ची एक पावती मिळेल ही पावती तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सेव करून ठेवा.

योजनेचा लाभ घेण्यासाटी कोणते कागदपत्रे आहे आवश्यक

ही योजना फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळणार आहे त्यामुळे यासाठी सघ्यायचार्वात महत्वाचे म्हणजे जात प्रमाणपत्र.

लाभार्थ्याकडे विहर आहे याचे प्रमाणपत्र.

लाभार्थाचे उत्पन्न प्रमाणपत्र.

लाभार्थ्याचा जमिनीचा ७ बारा.

जमीन धारणा.

अर्दाराचे बंधपत्र. (500/100 रुपयाचे)

जमिनीची आणी गटविकास शिफारसपत्र.

ज्या विहिरीमध्ये या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या ठिकाणचे चालू कामाचे फोटो.

वरील हे सर्व कागदपत्रे तुम्हाला आर करताना लागणार आहे. Inwell boring online application.

जॉबकार्ड काढा लगेच

Leave a Comment