Milk dairy subsidy scheme दुध डेअरी सुरु करण्यासाठी नाबार्डकडून मिळेल 4.40 लाख रुपयांपर्यत सबसिडी

दुध डेअरी सुरु करण्यासाठी मिळेल अनुदान. जाणून घेवूयात दुध डेअरी अनुदान संदर्भातील सविस्तर माहिती milk dairy subsidy scheme.

तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही तुमच्या गावामध्ये दुध डेअरीचा व्यवसाय सुरु करू शकता. दुध डेअरीमध्ये दुध संकलन गावातच चांगला नफा मिळविता येतो.

कोणताही व्यवसाय करायचा म्हटल्यास त्यासाठी सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे भांडवल. तुमच्याकडे भांडवल नसेल तर तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यास अडचण निर्माण होऊ शकते.

तुम्ही जर तुमच्या गावामध्ये किंवा गाव परिसरामध्ये ज्या ठिकाणी मार्केटचे ठिकाण आहे अशा ठिकाणी दुध डेअरी व्यवसाय सुरु केला तर नक्कीच तुमचा व्यवसाय चांगल्या पद्दतीने सुरु होऊ शकतो.  दुध डेअरीसाठी 25 ते 33 टक्क्यांपर्यंत अनुदान देखील मिळते.

बांधकाम कामगार नोंदणी अर्जाची माहिती तपासा मोबाईलवर

दुध डेअरी सुरु करण्यासाठी 25 ते 33 टक्क्यांपर्यंत अनुदान देखील मिळते

दुध डेअरी सुरु करण्यासाठी तुम्हाला मिल्किंग मशीन, मिल्क स्टोअर, बल्क कुलिंग युनिट्स इत्यादी मशिनरींची आवश्यकता असल्यास यासाठी नाबार्डकडून सबसिडी मिळते.

तुम्हाला जर दुधापासून विविध पदार्थ तयार करून विक्री करायची असेल तर त्यासाठी सुद्धा एकूण प्रकल्प खर्चाच्या 25 ते 33 टक्क्यांपर्यत सबसिडी मिळते.

अर्थात यासाठी तुम्हाला दुध डेअरी व्यवसाय करण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे किंबहुना तुम्ही त्या संदर्भात प्रशिक्षण घेणे गरजेचे असते जेणे करून दुध तपासण्याचे तंत्र तुम्हाला अवगत होईल.

दुध डेअरी अनुदान मिळविण्यासाठी जी पद्धत आहे ती अशी आहे

तुमच्या जवळच्या बँकेत जा ती बँक नाबार्डच्या योजनांशी संलग्न आहे का या संदर्भात माहिती घ्या.

दुसरा पर्याय म्हणजे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी नाबार्डचे कार्यालय असते त्या ठिकाणी जावून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

बँकेकडून मिळालेल्या कर्जावर नाबार्ड तुम्हाला अनुदान देते. तुम्ही जर खुल्या प्रवर्गातील शेतकरी असाल तर एकूण प्रकल्प खर्चाच्या 25 टक्के आणि तुम्ही जर SC, ST प्रवर्गातील शेतकरी असाल तर 33.33 टक्के सबसिडी मिळते.

उदाहरणार्थ दुध डेअरी सुरु करण्यासाठी कुलिंग मशीन व इतर मशिनरी घेण्यासाठी युनिट कॉस्ट 13.20 लाख असेल तर 25 टक्क्याने तुम्हाला 3.30 लाख सबसिडी नाबार्डकडून मिळू शकते. तुम्ही जर SC, ST प्रवर्गातील शेतकरी असाल 33.33 टक्क्याने हि सबसिडी 4.40 लाख एवढी होते.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा

विविध योजनांसाठी मिळते नाबार्ड कडून अर्थसहाय्य

केवळ दुध डेअरीच नव्हे तर दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी आवश्यक असणारी मशिनरी खरेदी करण्यासाठी देखील तुम्हाला अनुदान मिळते.

तुम्ही जर बेरोजगार असाल तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेवून तुमच्या गावात किंव गाव परिसरामध्ये दुध डेअरी व्यवसाय सुरु करू शकता.

नाबार्डच्या दुध डेअरी संदर्भातील अनुदानाची pdf तुम्हाला हवी असेल खालील लिंकवर क्लिक करून हि pdf download करून घ्या.

अनुदान pdf

Leave a Comment