New ration card registration online process मोबाईलद्वारे करा नविन राशनकार्डसाठी ऑनलाईन नोंदणी

New ration card registration ज्या व्यक्तींकडे राशन कार्ड नाही त्यांना स्वस्त धान्य दुकानातील धान्य व इतर सुविधांचा लाभ मिळत नाही. तुम्हाला जर नवीन राशन कार्ड काढायचे असेल तर त्यासाठी तहसील कार्यालयात जावे लगते कार्यालयात जाण्यायेण्यासाठी बराच वेळ वाया जातो. अशावेळी आता तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून नवीन राशनकार्डसाठी ऑनलाईन नोंदणी करू शकता.

नवीन राशन कार्ड New ration card registration पद्धत कशी आहे या संदर्भात सविस्तर माहिती समजावून घेवूयात जेणे करून तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून तुमचे किंवा तुमच्या नातेवाइकांचे राशन कार्ड नोंदणी करू शकता.

खालील व्हिडीओ पहा

New ration card registration अशी करा राशन कार्ड नोंदणी

तुमच्या मोबाईलमधील गुगलक्रोम ब्राउजर ओपन करा.

गुगलच्या search box  मध्ये mahafood असा कीवर्ड टाका आणि सर्च करा.

अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईटची लिंक दिसेल त्यावर टच करा.

या ठिकाणी वेबसाईट ओपन झाल्यावर तुमच्या मोबाईलस्क्रीनला थोडे झूम करून ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली हि लिंक शोधून त्यावर टच करा.

आता Nation food security program हि वेबसाईट ओपन होईल. या ठिकाणी देखील स्क्रीनला झूम करून Sign in आणि register हा पर्याय शोधून त्यावर टच करा.

या ठिकाणी तुम्हाला public login या पर्यायावर टच करायचे आहे.

जसे हि तुम्ही public login या पर्यायावर टच कराल त्यावेळी आणखी दोन पर्याय तुम्हाला दिसतील. 1 हिला पर्याय म्हणजे Registered user व New user sign up here.

Registered user व New user sign up here. यामधील फरक काय

तुमच्याकडे जर अगोदरच राशन कार्ड असेल तर तुम्ही Registered user या पर्यायवर टच करून लॉगीन करू शकता. परंतु तुमच्याकडे राशन कार्ड नाही आणि परंतु तुम्हाला आता नवीन राशन कार्ड हवे आहे अशावेळी तुम्हाला New user sign up here या पर्यायावर टच करून आधी नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यावर तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड मिळतो.

नोंदणी केल्यानंतर मिळालेल्या युजर आयडी आणि पासवर्डचा उपयोग करून तुम्ही लॉगीन करू शकता. परंतु तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर तुम्ही लगेच लॉगीन करू शकता.

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

राशन कार्ड नसेल तर New user sign up here वर क्लिक करून खालील माहिती सादर करा

New user sign up here या पर्यायावर टच केल्यानंतर तीन पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी I want to apply for new ration card या पर्यायावर टच करा.

या ठिकाणी एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये जी माहिती विचारलेली आहे ती संपूर्ण माहिती व्यवस्थित सादर करा. कुटुंबप्रमुख म्हणून तुमच्या घरातील स्त्रीचे नाव या ठिकाणी अर्जदार म्हणून टाकायचे आहे. या अर्जामध्ये खालील माहिती सादर करा.

भाषा. अर्जदाराचे नाव अर्जदाराचे नाव टाईप करतांना ते असे टाईप करा जसे कि ते आधार कार्डवर टाईप केलेले आहे.

त्यानंतर जेन्डर निवडा. मोबाईल नंबर. इमेल adress. लॉगीन आयडी निवडा. लॉगीन आयडी जो उपलब्ध असेल तोच मिळेल check availability या पर्यायावर टच करून तुम्ही उपलब्ध आयडी तपासू शकता. त्यानंतर पासवर्ड तुमच्या पद्धतीने निवडा. दोन वेळा हा पासवर्ड टाका आणि कन्फर्म करा.

सर्वात शेवटी Get otp या पर्यायावर टच करून otp मिळवा आणि दिलेल्या चौकटीमध्ये तो otp टाकून सबमिट करा.

अशा पद्धतीने तुम्हाला आता तुमचा आयडी आणि पासवर्ड मिळाला आहे. या आयडी आणि पासवर्डचा उपयोग करून तुम्हाला नवीन राशनकार्डसाठी लॉगीन करायचे आहे.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना

New ration card registration राशन कार्ड काढण्यासाठी असे करा लॉगीन

परत एकदा मागच्या पेजवर या.

पब्लिक लॉगीन या पर्यायावर टच करा.

लॉगीन करण्याचे तीन पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसतील परंतु युजर आयडी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉगीन करायचे आहे.

या ठिकाणी माझ्याकडे अगोदरच राशन कार्ड असल्याने मी पहिला पर्याय वापरून लॉगीन करत आहे म्हणजेच enter Adhar number हा पर्याय वापरून लॉगीन करत आहे.

लॉगीन झाल्यावर apply for new ration card  हा पर्याय दिसेल यावर क्लिक करून तुम्ही जी माहिती त्या फॉर्ममध्ये विचारलेली आहे ती सादर करून द्या.

तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य असतील त्यांच्या सर्वांचे डिटेल एक एक करत यामध्ये सादर करून द्या. अर्ज सादर झाल्यापासून 40 ते 45 दिवसाच्या आत तुम्हाला नवीन राशन कार्ड मिळेल.

किंवा तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास त्या संदर्भातील सूचना देखील याच dashboard वर तुम्हाला दिसेल. सर्व माहिती व्यवस्थित असूनही तुम्हाला नवीन राशन कार्ड मिळत नसेल तर तुम्ही तहसील कार्यालयात जावून या संदर्भात चौकशी करू शकता.

ऑनलाईन राशन कार्ड कसे काढावे?

तुम्हाला जर ऑनलाईन राशन कार्ड काढायचे असेल तर त्यासाठी mahafood डॉट जीवोव्ही या वेबसाईटला भेट देवून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

कोणते कागदपत्रे करावी लागतात सादर?

या लेखामध्ये संपूर्ण माहिती दिली असून व्हिडीओ देखील देण्यात आलेला आहे ज्यामुळे तुम्हाला तुमचे राशन कार्ड ऑनलाईन पद्धतीने काढण्यास मदत मिळेल.

Leave a Comment