शिलाई मशीनसाठी अर्ज सुरू 90 टक्के अनुदान मिळणार shilai mashin application 2024

शिलाई मशीनसाठी अर्ज सुरू झाले आहे शेवटच्या तारखेच्या आत तुमचा अर्ज दाखल करून द्या जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल shilai mashin application.

ग्रामीण भागातील महिला व युवतींना शिलाई मशीनद्वारे रोजगार उपलब्ध होतो. यामुळे ग्रामीण भागासह शहरीभागामध्ये अनेक महिला व युवती शिलाई मशीन घेवून आपला व्यवसाय करतांना दिसतात.

तुम्ही स्वत: किंवा तुमच्या घरातील कोणी सदस्य शिलाई मशीन घेवू इच्छित असेल तर त्यांना आता अनुदानावर शिलाई मशीन मिळणार आहे.

जाणून घेवूयात शिलाई मशीन अर्ज संदर्भातील सविस्तर माहिती.

महिला विभागाच्या वतीने शिलाई मशीनसाठी अर्ज सुरू

शासनाच्या महिला व बाल कल्याण विभाग बुलढाणा यांच्या वतीने पिको व फॉल शिलाई मशीनसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असले तर माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

शिलाई मशीनचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

ग्रामीण भागाकडे दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण हे वाढत चालले आहे. ग्रामीण भागाकडे महिलांना बाहेर जॉब करण्यामध्ये पण खूप अडचणी असतात त्यामुळे बऱ्याच महिला बाहेर जॉब करण्यासाठी टाळाटाळ करतात पण आता याची चिंता करायची गरज नाही.

आता ग्रामीण भागातील महिलांना मिळणार आहे पिक्को फॉल मशीन योजना चा लाभ जेणे करून त्या गावातच त्यांचा व्यवसाय सुरु करू शकतील.

ग्रामीण भागातील महिलांसाठी ही खूप चांगली संधी आहे स्वतःचा व्यावसाय सुरु करण्याची. घरी बसून पैसे कामाण्याची ही चांगली संधी आहे.

ही योजना कशी आहे आणि योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करायचा ही सर्व माहिती आपण आज जाणून घेणार आहोत त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

पिक्को फॉल मशीन योजना असा घ्या या योजनेचा लाभ.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत त्या खालीलप्रमाणे

१. ज्या लाभार्थ्याला अर्ज करायचा आहे तो ग्रामीण भागातील असावा म्हणजेच लाभार्थ्याचे रहिवासी हे ग्रामीण भागातील असावे.

२. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे १,२०००० पर्यंतच असावे किंवा यापेक्षा जास्त नसावे. लाभार्थ्याजवळ तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

३. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोगट सुद्धा ठरवण्यात आलेले आहे जसे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय हे ४५ वर्ष पेक्षा जास्त नसावे आणि १७ वर्षापेक्षा कमी नसावे.

४. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वेळेच्या आता अर्ज करावा लागणार आहे. जर तुमचा अर्ज हा उशिरा जमा करण्यात आला तर तो स्वीकारण्यात येणार नाही.

५. योजनेचे अनुदान घेण्यासाठी अर्जदाराकडे बँक खाते असणे आवश्यक आहे आणी त्या बँक खात्याला अर्जदाराचे आधार कार्ड सुद्धा लिंक असावे.

६. ज्या लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घ्याचा आहे त्या लाभार्थ्याच्या परिवारातील सदस्य सरकारी कर्मचारी नसावा.

महत्वाची कागदपत्रे.

१. लाभार्त्याची TC झेरॉक्स किंवा वयाचा दाखला.

२. लाभार्थ्याचे आधार कार्ड आणी राशन झेरॉक्स.

३. जे बँक खाते अर्जदार अर्ज करताना देणार आहे त्या बँक खात्याचे पासबुकचे झेरॉक्स.

४. विज बिल झेरॉक्स.

वरील हे सर्व कागदपत्रे तुम्हाला अर्ज करताना आवश्यक लागणार आहे.

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असले तर यासाठी तुम्हाला अर्ज करवा लागणार आहे हा अर्ज तुहाला offline पद्धतीने करावा लागणार आहे.

शिलाई मशीनसाठी अर्ज सुरू कोठे कराल अर्ज

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महिला व बालकल्याण विभाग बुलाढाणा यांच्या कार्यलयात सादर करावा लागणार आहे. पिक्को फॉल ही योजना फक्त बुलढाणा या जिल्ह्या पर्यंत मर्यादित आहे.

अर्ज करण्याची पद्धत ही अतिशय सोपी आहे. या योजनेचा अर्ज हा फक्त बुलडाणा जिल्ह्या पर्यंत मर्यादित असल्याने फक्त बुलडाणा जिल्ह्यातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे.

जर तुम्हला सुद्धा नवीन राशन कार्ड ऑनलाईन पद्धतीने काढायचे असेल तर या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

अशाच नवीन शासकीय योजनाची माहिती मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

instagram

Leave a Comment