शेतकऱ्यांना मिळणार एक शेतकरी एक डीपी योजनेचा लाभ. ही योजना शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना शेतातील डीपी देण्यात येणार आहे.
सर्वसाधारण शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देण्यास खूप अडचणींचा सामना करावा लागतो. योग्य वेळेवर वीज नसल्यावर पिकांना पाणी देता येत नाही त्यामुळे बऱ्याच वेळेस पिकांचे नुकसान होते.
ही समस्या लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी एक शेकरी एक डीपी ही योजना राबिवण्यात येत आहे. या योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना शेतामध्ये डीपी भेटणार आहे.
या एक शेतकरी एक डीपी योजनेचा लाभ कसा घ्यायचा अर्ज कोठे करायचा आणि कसा करायचा व यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे ही सर्व माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.
योजनेचे स्वरूप
या योजने अंतर्गत शेतकऱ्याला डीपी मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला अर्ज करावा लागणार आहे.
जे लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे त्यांना काही रक्कम सुद्धा भरावी लागणार आहे जसे की अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रवर्गातील लाभार्थ्याला पाच हजार एक HP याप्रमाणे भरावे लागणार आहे तसेच सामान्य प्रवर्गातील लाभार्थ्यांना सात हजार एक HP नुसार रक्कम द्यावी लागणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यी हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. हा अर्ज कसा करवा आणि कुठे करावा बघूया खालीलप्रमाणे.
एक शेतकरी एक डीपी योजना ऑनलाईन अर्ज
लाभार्थी हा अर्ज त्यांच्या मोबाईलवर सुद्धा करू शकता. अर्ज करण्यासाठी या लिंक वर क्लिक करायचे आहे.
आता तुमच्यासमोर ए-1 नावाने एक पेज open झालेले आहे त्याला वर लोटा.
सामान्य माहिती याखाली कृषी या पर्यायावर टच करा.
या ठिकाणी नवीन अर्ज असा पर्याय दिसेल त्यावर टच करा.
आता या ठिकाणी तुम्हाला किती HP ची डीपी हवी आहे ते टाका.
अर्जदाराला या ठिकाणी काही प्रश्न विचारण्यात येईल.
ही सर्व माहिती योग्य रित्या भरल्यानंतर अर्जदाराचे महत्वाचे documents upload करा आणि सबमिट करा.
अर्जदाराचा चालू मोबाईल क्रमांक टाका.
OTP टाका आणि सबमिट करा.
कागदपत्रे
अर्जदाराचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड.
पासबुक झेरॉक्स.
वीज बिल.
सातबारा आणि ८.अ.
लाभार्थ्याच्या जातीचा दाखला.
वरील हे सर्व कागदपत्रे अर्ज करताना लाभार्थ्याला आवश्यक लागणार आहे.