ऑनलाईन बांधकाम कामगार नोंदणी करा फक्त १ रुपयात

बांधकाम कामगार अंतर्गत नोंदणीकृत लाभार्थ्यांना अनेक योजनांचा लाभ मिळत असतो. या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांची नोंदणी आवश्यक असते.

ही नोंदणी लाभार्थी मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करू शकतो यासाठी मात्र एक रुपया इतका खर्च लाभार्थ्याला येणार आहे.

जर लाभार्थी हा बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असला तर लाभार्थ्याला 32 येजनांचा लाभ मिळणार आहे.

बांधकाम कामगार नोंदणी ही प्रक्रिया खूप सोपी आहे जर तुम्हाला सुद्धा बांधकाम कामगार नोंदणी करायची असेल तर माहिती शेवटपर्यंत वाचा.

अशी करा बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन पद्धतीने

या येजनेची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.

आता तुमच्या समोर एक नवीन पेज निर्माण होईल याठिकाणी तुम्हाला लाभार्थ्यांचे जवळचे WFC स्थान निवडायचे आहे. या नंतर आधार कार्ड क्रमांक आणि चालू मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. आता खालील निळ्या बटणावर टच करा.

आता परत तुमच्या समोर एक अर्ज आलेला आहे यामधे लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती भरायची आहे जसे की लाभार्थ्यांचे संपूर्ण नाव, लिंग आणि अर्ज दाराचा आधार याठिकाणी आलेले असेल.

लाभार्थ्यांची वर्गवारी जन्मतारीख ही संपूर्ण माहिती या ठिकाणी भरा.

लाभार्थ्याचा ईमेल आयडी टाका. अजरजराची विवाहस्थिती निवडा.

शेवटी या ठिकाणी पत्ता टाका

कौटुंबिक माहिती

अर्जदाराच्या घरात एकूण किती व्यक्ती आहे त्यांची नावे.

आधार कार्ड नंबर आणि कोणता व्यवसाय आहे का ही माहिती.

लाभार्थ्यांच्या बँकेचे IFSC कोड आणि बँकेची शाखा माहिती व खते क्रमांक

लाभार्थ्याला ९० दिवस काम केले आहे याचा पुरावा म्हणून प्रमाणपत्र.

वरील ही सर्व माहिती माहिती लाभार्थ्याला अर्ज करताना आवश्यक लागणार आहे.

हा अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याला कोणते कागदपत्रे कोणते आहे बघा खालीलप्रमाणे.

कागदपत्रे

लाभार्थ्याचे रहिवासी प्रमाणपत्र.

पासबुक झेरॉक्स.

लाभार्थ्याने ९० दिवस काम केलेले आहे याचा पुरावा म्हणून ९० प्रमाणपत्र (काम केल्याचे)

अर्जदाराचा फोटो.

स्वयंघोषणापत्र.

लाभार्थ्याच्या वयाचा पुरावा.

हे कागदपत्रे अर्ज करताना आवश्यक लागणार आहे या कागदपत्रांची size २ MB च्या आत असावी.

जर या ठिकाणी ही साईट व्यवस्थित रित्या चालत नसेल किंवा काही तांत्रिक अडचणी येत असेल तर या ठिकाणी तुम्हाला काही वेळाने किंवा 24 तासाने पुन्हा प्रयत्न करायचा आहे.

कधी कधी साईट ही व्यवस्थित रित्या चालत नसल्याने बऱ्याच अडचणी येतात. जर ही साईट तुम्हाला बंद दाखवत असेल तर ती काही दिवसांनी परत चालू होईल.

जर तुमची नोंदणी या ठिकाणी यशस्वी झाली तर तुम्हाला बांधकाम कामगार योजना मंडळामार्फत राबविण्यात जाणाऱ्या 32 योजनांचा लाभ मिळू शकतो त्यामुळे बांधकाम कामगार नोंदणी करणे आवश्यक आहे.

अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन कामगार नोंदणी तुमच्या मोबाईलवर करू शकता.

ही माहिती गरजूंपर्यंत नक्की पोहचावा.

instagram पेज follow करा.

योजनेचा लाभ घ्या

रेशनकार्ड ऑनलाईन नोंदणी करा. संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment