पीएम श्रम योगी मानधन योजना. पती-पत्नीला मिळणार प्रति महिना ६००० हजार

पीएम श्रम योगी मानधन योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ३ हजार आणि जोडप्यांना(पती पत्नीला) ६ हजार रुपये प्रति महिना लाभ देण्यात येणार आहे.

जर तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती हवी असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा या लेखांमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

या योजनेमध्ये लाभार्थ्याला काही गुंतवणूक करणे गरजेचे आहे ही गुंतवणूक किती करायची आणि कशी करायची ही सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत.

लाभार्थ्याला या योजनेमध्ये प्रति महिना 55 रुपये ते 200 रुपये पर्यंत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी जितक्या रकमेची गुंतवणूक केली आहेत की समान रक्कम लाभार्थ्याला केंद्र शासनाकडून देय करण्यात येते. या योजनेमध्ये लाभार्थ्याच्या वया मानानुसार लाभार्थ्याला मासिक योगदान दिले जाते.

पीएम श्रम योगी मानधन योजना काय आहे पात्रता

जर तुम्हाला पीएम श्रम योगी मानधन योजना अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर यासाठी काही पात्रता  ठरवून दिलेले आहे. या पात्रता कोणत्या आहे कशा आहे आणि कोणती लाभार्थी पात्र आहे बघा खालील प्रमाणे.

लाभार्थी हा भारतीय असावा.

शेती संबंधित काम करणारे लाभार्थी.

बांधकाम कामगार.

मच्छीमार.

सुतार.

 हातमाग.

ऑटो व्हीलर.

रस्त्यावरील विक्रेते.

मिड मिल.

धोबी (कपडे धुणारे).

अशा भरपूर प्रकारच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही वयोमर्यादा सुद्धा ठरवून दिलेली आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी वय हे 18  वर्षे किंवा यापेक्षा जास्त असावे आणि ४० वर्ष किंवा यापेक्षा कमी असावे.

लाभार्थ्याचे मासिक उत्पन्न हे 15000 किंवा यापेक्षा कमी असावी तरच लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे.लाभार्थी किंवा लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य हा सरकारी कर्मचारी नसावा.

पीएम श्रम योगी मानधन योजना फायदे

या योजनेचे बरीच चे फायदे आहे जसे की लाभार्थ्याची वय 60 वर्षे पूर्ण झाले तर लाभार्थ्याला तीन हजार रुपये प्रति महिना पेन्शन देण्यात येणार आहे.

पात्र लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर लाभार्थ्याचा जोडीदार एकूण ५० टक्के पेन्शनसाठी पात्र ठरणार.

लाभार्थी आणि लाभार्थ्याच्या जोडीदाराने सुद्धा या योजनेमध्ये भाग घेतलेला असेल तर वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दोघांनाही प्रति महिना सहा हजार रुपये इतकी पेन्शन देण्यात येते.

असा घ्या या योजनेचा लाभ

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कोणत्याही बँकेमध्ये प्रधानमंत्री श्रम धन योजना साठी खाते उघडणे बंधनकारक आहे.

हे खाते तुम्ही पोस्ट बँकमध्ये सुद्धा उघडू शकता.

हे खाते उघडल्यानंतर यामध्ये तुम्हाला या पैशाची गुंतवणूक करावी लागणार आहे तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजना

Leave a Comment