40 दुष्काळी तालुक्यांसाठी मंजूर केलेले अनुदान आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे dushkal jahir 2024. ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे त्यांना हे अनुदान मिळणार आहे. या संदर्भात शासनाने जानेवारी महिन्यामध्ये जीआर सुद्धा निर्गमित केलेला होता.
जर तुम्हाला हा जीआर बघायचा असेल किंवा तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करायचा असेल तर लेखाच्या शेवटी तुम्हाला जीआर डाऊनलोड करा असे बटन दिसेल त्यावर टच करून तुम्ही हा जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता.
शासनाच्या वतीने दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता यामध्ये एकूण 40 तालुके होते. या तालुक्यांमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला 8 हजार 500 रुपये प्रतेक हेक्टर इतके अनुदान देण्यात येणार आहे.
हे अनुदान एकूण 22 लाख 90 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे यासाठी एकूण 2400 कोटी रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे.
याचबरोबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांची पावसामुळे बरेच नुकसान झालेले होते. यामध्ये एकूण 32 जिल्ह्यांचा समावेश होता. या नुकसानीसाठी सुद्धा शासनाच्या वतीने 2240 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला होता.
हे अनुदान फक्त ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे त्यांनाच वितरित करण्यात येत आहे ज्या शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे त्यांना आधी केवायसी करणे आवश्यक आहे. केवायसी राहिलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या आता निघत आहे.
दुष्काळी अनुदान होणार खात्यात जमा कोणत्या जिल्ह्यांना किती मिळणार अनुदान dushkal jahir 2024
मालेगाव, सिन्नर आणि येवला (नाशिक जिल्हा) यामध्ये एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या खालील प्रमाणे आहे.
मालेगाव तालुक्यामध्येमध्ये बाधित शेतकरी संख्या 101912.
सिन्नर तालुक्यांमध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या 85865.
येवला तालुक्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या 63898.
याप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 251675 शेतकरी बाधित ठरविले आहे.
अशाप्रकारे बरेचशे जिल्हे आणि तालुके या जीआर मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे या जीआर मध्ये तुमचा जिल्हा तालुका आहे का हे बघण्यासाठी तुम्ही खालील जीआर डाऊनलोड करा या बटनावर क्लिक करून बघू शकता.
धुळे मधील सिंदखेडा शेतकरी संख्या ६७४९२.
नंदुरबार, नंदुरबार ५१२५८.
जळगाव, चाळीसगाव ८४४७१.
बुलढाणा, बुलढाणा ५५८४४.
बुलढाणा, लोणार ७००८४.
अशा प्रकारे एकूण ४० जिल्हे या जीआर मध्ये दिलेले आहे
ही सविस्तर आणि अधिकृत माहिती तुम्ही जीआरमध्ये बघू शकता.