उन्हाळी ई पिक पाहणी सुरू e peek pahani 2024

शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण उन्हाळी ई पिक पाहणी झाली सुरु. बरेच शेतकरी उन्हाळ्यातील ई पीक पाहणीची खूप दिवसापासून वाट बघत होते त्यांची ही प्रतीक्षा आता समाप्त झालेली आहे.

उन्हाळी पीक पाहणी कशी करावी आणि यासाठी प्ले स्टोअर वर एक नवीन अपडेट सुद्धा याबाबत आलेले आहे नवीन ॲप्लिकेशन सुद्धा आलेले आहे याबाबत संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

शेतकऱ्यांना एका वर्षातून एकूण तीन वेळेस ही पिक पाहणी करावी लागते ज्यामध्ये खरीप हंगाम रब्बी हंगाम आणि उन्हाळी हंगाम हे तीन हंगाम सामील असतात यांची ई पीक पाहणी करणे शेतकऱ्यांना गरजेचे असते.

उन्हाळा सुरू झाल्याने आता उन्हाळी हंगामाची ई पीक पाहणी करणे शेतकऱ्यांसाठी गरजेचे आहे अरबी हंगाम आणि खरीप हंगाम या ई पीक पाहण्या बऱ्याच शेतकऱ्यांनी पूर्ण केलेले आहेत पण आता उन्हाळी हंगाम ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे.

उन्हाळी पिक पाहणी सुरू करणे का आहे गरजेचे

ही उन्हाळी ई पीक पाहणी करण्यासाठी प्ले स्टोअर वर अधिकृत एप्लीकेशन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचे आहे.

केंद्र शासनाच्या आदेशानुसार खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम हे डिजिटल क्रॉप सर्वे या ॲपवरून सुद्धा ई पीक पाहणी करता येत होती.

या ॲपमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करताना खूप सार्‍या अडचणी येत होत्या यामुळे ई पीक पाहणी (DSC) हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

शेती संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ही ई पीक पाहणी करणे गरजेचे असते. त्यामुळे ही ई पीक पाहणी आवश्य करून घ्या.

ही समस्या लक्षात घेऊन 13 एप्रिल 2024 या तारखेला play store वर हे ई पिक पाहणी latest version उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

ज्या ज्या शेतकऱ्यांचे हे पीक पाहणी काही अडचणींमुळे किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे बाकी राहिली होती त्यांना आता ही खूप आनंदाची बातमी ठरणार आहे त्यांची उन्हाळी ईपीक पाहणी होणार आहे.

या ॲप वरून तुम्हाला तुमच्या उन्हाळी हंगाम ई पिक पाहणी करायची आहे. ही ई पीक पाहणी करण्यासाठी तुमचे गाव डिजिटल क्रॉप सर्वे या ॲप्लिकेशन वरून निवडले आहे का याची खात्री मात्र नक्की करा.

जर तुमचे गाव डिजिटल क्रॉप सर्वे या ॲप्लिकेशन वरून निवडले गेले नसेल तर लवकरच तुमचे गाव निवडले जाईल.

ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर वरून हे ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे आणि यामध्ये तुम्ही तुमची उन्हाळी पीक पाहणी करू शकता.

हे ॲप डाऊनलोड केल्यावर तुम्हाला या ठिकाणी तुमचा महसूल विभाग निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला लॉगिन करण्याची पद्धत विचारली जाईल या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय दिलेले आहेत एक म्हणजे शेतकरी म्हणून आणि दुसरा म्हणजे इतर म्हणून या ठिकाणी तुम्हाला शेतकरी म्हणून लॉगिन करायचे आहे.

शेतकरी या पर्यावरणातील केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक टाकून पुढील प्रक्रिया करायची आहे.

मोबाईल क्रमांक टाकल्यावर तुम्हाला या ठिकाणी निवडलेला विभाग दाखवेल त्याखाली तुम्हाला जिल्हा तालुका आणि तुमचे गाव निवडायचे आहे.

ई मुद्रा लोन

Leave a Comment