पीएम किसान नवीन नोंदणी pm kisan samman nidhi new registration 2024

पीएम किसान योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत म्हणून बँक खात्यामध्ये जमा करून देण्यात येते यासाठी पीएम किसान नवीन नोंदणी झालेली असावी.

प्रति वर्ष सहा हजार रुपये निधीचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्याला यासाठी नोंदणी करण्याची आवश्यकता आहे जर तुमची नोंदणी झालेली नसेल तर सर्वात पहिले तुम्हाला नोंदणी करण्याची गरज आहे.

पीएम किसान नोंदणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता ही नोंदणी करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे ही संपूर्ण प्रक्रिया या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे ही नोंदणी करताना तुम्हाला मुख्य 6 steps आहे. या 6 steps कोणत्या आहे आणि ऑनलाईन नोंदणी कशाप्रकारे करायची बघूया संपूर्ण माहिती.

अशा पद्धतीने करा पीएम किसान नवीन नोंदणी

पीएम किसान नवीन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या मोबाईल मधील ब्राउझर मध्ये pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागणार आहे.

वरील अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला ही ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी करण्यासाठी महत्त्वाच्या सहा स्टेप्स कोणत्या आहे व या कशा पद्धतीने करायचे आहे ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बरेच पर्याय दिसतील त्यापैकी सर्वात पहिला पर्याय म्हणजेच न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या पर्यायावर तुम्हाला टच करायचे आहे.

आता या ठिकाणी तुमच्यासमोर परत एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आधार क्रमांक आणि तुमचे राज्य निवडायचे आहे त्याखाली तुम्हाला Captcha भरायचा आहे आणि Get OTP ओटीपी या बटणावर टच करायची आहे.

जो मोबाईल क्रमांक तुम्ही या ठिकाणी दिलेला आहे त्या मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवण्यात येईल आलेला OTP या चौकटीत टाका.

आलेला OTP या ठिकाणी टाका आणि यानंतर तुम्हाला परत एक बटन दिसेल proceed for registration यावरती टच करा.

जी माहिती किंवा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारल्या जाईल ती अतिशय योग्यरित्या तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे आणि यानंतर तुम्हाला Aadhar authentication करायचे आहे जी माहिती तुम्ही भरली आहे ती माहिती योग्य असेल याची खात्री करा.

आता परत या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर एक OTP पाठवण्यात येईल हा OTP या ठिकाणी टाका आणि यानंतर तुम्हाला काही तुमच्या शेती संबंधित कागदपत्रे विचारले जाईल जे काही कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला मागण्यात येत आहे ते सर्व कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे.

ही संपूर्ण माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीनवर registration complete असा मेसेज दिसेल हा मेसेज दिसल्यानंतर तुमचे  registration तुमची नोंदणी या ठिकाणी यशस्वीरित्या झालेली आहे.

अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पीएम किसान योजनेसाठी नवीन नोंदणी करू शकता.

नोंदणी झालेल्या पात्र शेतकरी आता वार्षिक सहा हजार रुपये घेण्यासाठी पात्र ठरणार आहे या शेतकऱ्याला प्रतिवर्षी सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

ऑनलाईन सातबारा दुरुस्ती

Leave a Comment