प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना प्रति महिना ३००० पेन्शन मिळणार shram yogi mandhan yojana 2024

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना अंतर्गत कामगारांना तीन हजार रुपये प्रति महिना इतकी पेन्शन देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ हा संघटित कामगारांना मिळणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते लाभार्थी पात्र आहे आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ही संपूर्ण माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्ही सुद्धा जर एक असंघटित कामगार असाल तर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता.

कामगारांच्या पुढच्या उज्वल भविष्यासाठी राबवली जाणारी ही एक योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जशी ती या योजनेसाठी पात्र ठरेल तसे त्यांना तीन हजार रुपये महिना इतकी पेन्शन सुरू करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही एक सरकारी योजना आहे. ही योजना राबविणे मागच्या उद्देश्य म्हणजेच समाजाचे कल्याण व सुरक्षा करणे आहे.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना लाभ घेण्यासाठी कोण आहे पात्र

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी काही अटी आहे आणि काही पात्रता सुद्धा या ठिकाणी ठरवून दिलेले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी असंघटित कामगार हे पात्र ठरणार आहे जसे की वीट भट्टी कामगार, मोची, रस्त्यावरील विक्रेते, घरातील कामगार, भोजन कामगार, धोबी, शेती कामगार, बांधकाम कामगार, हेड लोडर, चामडे कामगार, रिक्षा चालक, भूमिहीन मजूर, दृकश्राव्य कामगार यांसारख्या कोट्यावधी (४२ कोटी) कामगारांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना खात्रीशीर पेन्शन देण्यात येणार आहे त्यामुळे या योजनेचा लाभ नक्कीच घ्या. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी सुद्धा लागू केलेले आहेत या अटी कोणत्या आहे व कशाप्रकारे आहे बघूया खालील प्रमाणे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा 18 वर्षापासून 40 वर्ष वयोगटापर्यंत असायला हवा या वयोगटातील लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतो.

या योजनेमध्ये तुम्हाला कौटुंबिक लाभ सुद्धा मिळणार आहे म्हणजेच तुमच्या जोडीदाराला सुद्धा या योजनेमध्ये लाभ मिळणार आहे. काय कारणास्तव लाभार्थ्यांचा जर मृत्यू झाला तर लाभार्थ्याचा 50% लाभ हा त्याच्या जोडीला देण्यात येणार आहे.

एकदा जर लाभार्थी या योजनेसाठी पात्र झाला तर दरमहा लाभार्थ्याला तीन हजार रुपये इतकी पेन्शन देण्यात येणार आहे. असंघटित कामगारांना त्यांच्या आर्थिक गरजा या योजनेअंतर्गत चांगल्या पद्धतीने पूर्ण करता येणार आहे.

ज्या लाभार्थ्यांचे वय 18 वर्षापासून चाळीस वर्षाच्या दरम्यान आहे त्या लाभार्थ्यांना रुपये 55 पासून ते 200 इतके रुपये तुम्हाला या योजनेसाठी द्यावे लागणार आहे म्हणजेच जमा करावे लागणार आहे.

पात्र लाभार्थ्याची वय जर 40 वर्षे असेल तर 40 वर्षापासून 55 वर्षापर्यंत लाभार्थ्याला दरमहा दोनशे रुपये जमा करायचे आहे. या अंतर्गत लाभार्थ्याची ही साठ वर्षे पूर्ण होईल तसेही लाभार्थ्याला खात्रीशीर तीन हजार रुपये प्रति महिना इतकी पेन्शन देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे म्हणजेच पात्र लाभार्थ्याचे मासिक उत्पन्न हे 15000 किंवा यापेक्षा कमी असावे तरच लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

जे व्यक्ती कर भरतात ते व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे ते लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.

कोणते कागदपत्रे आहे आवश्यक

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात पहिले लाभार्थ्याकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी तुम्हाला जास्त काही कागदपत्रांची आवश्यकता नाही पण मात्र आधार कार्ड आणि बँकेचा IFSC क्रमांक असणे आवश्यक आहे.

अशा पद्धतीने आपण बघितले आहे की या योजनेसाठी कोणते लाभार्थी पात्र आहे आणि या योजनेसाठी कोणत्या अटी आहे व कोणते कागदपत्रे लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे. आता आपण बघणार आहोत की या योजनेचा लाभ कसा घ्यायचा.

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुम्ही ज्याही बँक मध्ये खाते उघडले आहे त्या बँक मध्ये जाऊन तुम्हाला श्रम योगी मानधन योजना बद्दल माहिती घ्यायची आहे किंवा श्रम योगी मानधन योजना ची नवीन खाते तुम्हाला तुमच्या बँक मध्ये उघडायचे आहे.

ज्या बँकेकडे IFSC क्रमांक उपलब्ध असतो त्याच बँकेमध्ये तुम्हाला खाते उघडायचे आहे.

असंघटित कामगारांच्या उज्वल भविष्यासाठी ही एक अतिशय चांगल्या प्रकारची योजना आहे. कामगारांचे वय 60 वर्षे पूर्ण झाल्यास त्यांना ही तीन हजार रुपये पेन्शन प्रति महिना देण्यात येणार आहे.

voter list check online

Leave a Comment