ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवली जाणारी हीमुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये देण्यात येणार आहे जर तुमच्या घरातही कोणी ज्येष्ठ नागरिक असेल किंवा तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता.
या योजनेअंतर्गत आता फॉर्म भरणे सुरू झाले आहे ज्या पात्र लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल अशा लाभार्थ्यांना या अंतर्गत फॉर्म भरून द्यावे लागणार आहेत हे फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत.
महाराष्ट्र शासनाने या योजनेअंतर्गत 6 फेब्रुवारी 2024 रोजी जीआर सुद्धा निर्गमित केलेला आहे या जीआर मध्ये या योजनेअंतर्गत संपूर्ण माहिती दिलेली आहे.
जर तुम्हाला हा जीआर हवा असेल तर लेखाच्या शेवटी जीआर डाऊनलोड करा असे बटन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही हा जीआर डाऊनलोड करू शकता.
राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे या योजनेची उद्देश्य म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची सुरळीत जीवन सुखसुईचे जीवन असावे यासाठी पात्र लाभार्थ्यांना एक वेळी एक रकमी तीन हजार रुपये देण्यात येणार आहे. म्हणजेच एका वर्षातून एकदा या योजनेचा लाभ या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज सुरू असा घ्या लाभ
या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना प्रतिवर्षी एक रिकामी तीन हजार रुपये देण्यात येणार आहे हे तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या डीबीटी संलग्न बँक खात्यामध्ये रक्कम वितरित करण्यात येणार आहे यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
या योजनेसाठी फक्त 65 वर्षे व त्यावरील लाभार्थीच पात्र ठरणार आहे म्हणजेच जे जेष्ठ नागरिक आहे तेच या योजनेसाठी पात्र ठरणार आहे.
या योजनेअंतर्गत तुम्हाला बरेचसे उपकरण घेण्यासाठी हे तीन हजार रुपये देण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज आम्ही या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे.
जर तुम्हाला या योजनेचा अर्ज डाऊनलोड करायचा असेल तर हा अर्ज आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे लेखाच्या शेवटी जाऊन तुम्ही अर्ज डाऊनलोड करा या बटणावरती क्लिक करून हा अर्ज डाऊनलोड करू शकता.
हा फॉर्म भरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी समाज कल्याण विभागाकडे जायचे आहे या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज जमा करायचा आहे या अर्जासाठी ऑनलाईन प्रक्रिया अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही.
या योजनेच्या विधी वितरणाअंतर्गत शंभर टक्के लाभ तुम्हाला मिळणार आहे व तसेच हा निधी तुमच्या डीबीटी संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
कोणते कागदपत्रे आहे आवश्यक
आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या दोन्ही कागदपत्रांपैकी कोणतेही एक.
राष्ट्रीयकृत बँक पासबुकची झेरॉक्स.
पासपोर्ट साईज फोटो 2.
स्वयंघोषणापत्र.
अशा प्रकारची कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरताना लागणार आहे.
हा फॉर्म तुम्ही डाऊनलोड करून याची प्रिंट काढून समाज कल्याण विभागामध्ये हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे.
या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे आणि पासपोर्ट फोटो चेक करायचा आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज सुरू