बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुधारणा ४ लाखांपर्यंत मिळणार अनुदान

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुसूचित जाती व जमातींना या योजनेअंतर्गत भरपूर अशी फायदे होतात. दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे यांतर्गत या योजनेमध्ये भरपूर अशा सुधारणा करण्यात आलेले आहे.

या योजनेअंतर्गत कोणत्या नवीन अटी लागू करण्यात आलेले आहे व कोणत्या अटी रद्द करण्यात आलेली आहे ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विहीर खोदकाम करण्यासाठी 4 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येते. तसेच जुनी वेळ दुरुस्ती शेततळे खोदकाम ठिबक सिंचन तुषार सिंचन विज जोडणी शेततळ्याच्या अस्तरीकरण अशा विविध प्रकारच्या योजनांचा लाभ बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना देण्यात येतो.

या योजनेअंतर्गत अशा प्रमाणे खूप सार्‍या योजनांचे लाभ देण्यात येते परंतु यासाठी काही अटी व शर्ती लागू केलेले होत्या परंतु आता या अटींमध्ये बदल करण्यात आलेले आहे हे बदल कशाप्रकारे आहेत व नवीन अटी व शर्ती कोणत्या आहेत बघा खालील प्रमाणे.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना कोणते आहे बदल

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत नवीन विहीर खोदकाम करण्यासाठी पात्र लाभार्थ्याला बारा मीटर इतकी खोली आवश्यक होती परंतु आता ही अट रद्द करण्यात आलेली आहे.

या योजनेअंतर्गत विहीर खोदकाम करण्यासाठी दोन सिंचन विहिरीमध्ये कमीत कमी 500 फुटाचे अंतर असणे या अटीमुळे बऱ्याच लाभार्थ्यांची अर्ज रद्द करण्यात येत होती अनुसूचित जातीत जमिनीमधील लाभार्थ्यांकडे जमिनीची कमतरता असल्यामुळे बरेच लाभार्थी या अटीसाठी अपात्र ठरत होती यामुळे ही अट सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे.

नवीन सिंचन विहिरीसाठी दिले जाणारे एकूण अनुदान म्हणजेच 2 लाख 50000 हजार एवढे होते परंतु आता यामध्ये वाढ करण्यात आलेली असून नवीन सिंचन विहिरीसाठी एकूण 4 लाख इतकी अनुदान देण्यात येणार आहे.

याचप्रमाणे जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी 50 हजाराच्या ऐवजी एक लाख रुपये एवढे अनुदान देण्यात येणार आहे.

मिळेल बोरिंग साठी सुद्धा या अंतर्गत अनुदान वाढ करण्यात आलेली आहे 20000 च्या ऐवजी 40,000 देण्यात येणार आहे.

मोटर संच किंवा इतर सामग्री साठी 50 हजार रुपये इतकी अनुदान देण्यात येणार आहे.

शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी दिले जाणारे अनुदान वाढ करून दोन लाख किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% इतक्या प्रमाणात देण्यात येणार आहे.

तुषार सिंचन साठी सुद्धा या अंतर्गत 47 हजार किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% इतक्या प्रमाणात अनुदान देण्यात येणार आहे.

ठिबक सिंचन साठी सुद्धा अनुदान वाढ करण्यात आलेली आहे प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा किंवा 97 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे.

(माहिती स्त्रोत महासंवाद मंत्रिमंडळ निर्णय)

या संदर्भात लवकरच एक जीआर निर्गमित करण्यात येईल या जीआर मध्ये त्याबद्दलची संपूर्ण माहिती नवीन अटी व शर्ती कधी लागू होणार व कशा प्रकारे योजनेची अंमलबजावणी होणार ही संपूर्ण माहिती या जीआर मध्ये बघायला मिळेल.

ई श्रम कार्ड ई केयासी

instagram

Leave a Comment